__ मकरंद अनासपुरे आणि माधुरी दीक्षितचा सिन पहा " डॅंबिस" सिनेमा मधे.
म्हणून या सिनेमाचे नाव डॅंबिस आहे.
दि. ९ डिसेम्बर २०११ पासून जवळच्या चित्रपट गृहात.
Why this Kolavari Di...Why not Marathi SongWhy this Kolavari Di...Why not Marathi Songs ? We Don't even understand Kolavari....Then Why ? Just have a look here...A Marathi Song....with my own Feeling...My own Story.... Listen to it and give us the feedback A song in the most Discussed film DAMBIS written by Arvind Jagtap Composed by Anand Modak, Directed by Makrand Anaspure and Produced by Sayaji Shinde |
|
Still Photographs |
Director's Massageखूप मोठं घर, खूप भव्य शॉपिंग मॉल, चकचकीत गाड्या. सिनेमात नाही आता या गोष्टी प्रत्यक्षातही सहज बघायला मिळतात.
पण नाही बघायला मिळत तो आनंद, समाधान... धावणारे यंत्रवत चेहरे जिकडे तिकडे दिसतात आणि त्यांच्या धावण्याला कुणाचा आक्षेपअसण्याचं कारण नाही. पण ते एकटेच धावत असतात का? प्रत्येक माणसाला जन्मजात एक घर.. एक कुटुंब चिकटलेल असतं आणि ते ही नकळत त्याच्या मागे धावत असतं, कारण नसतांना! किंबहुना फरफटत असतं. आपल्या या धावपळीत आपल्या वेगाने मुलं नाही धावू शकणार हेही विसरून जातो आपण... खिडकीत जसा मनी प्लांट असतो ठेवलेला, भविष्याच्या आशेने किंवा बरा दिसतो म्हणून... तशीच मग मुलही डोकावताना दिसतात खिडकीत. फार फरक वाटत नाही मनी प्लांट च्या रोपात आणि मुलांमध्ये. हे चित्र कुठे तरी घट्ट रुतून बसलं मनात. जगात शांतता नांदावी आणि समृद्धी असावी, असं काहीबाही वाचताना आपल्या घरात डोकावण्याची सवड का काढत नाहीत लोकं, हासाधा प्रश्न अस्वस्थ करायचा. घरात लहान मुलाच्या रूपाने एक अस्वस्थ पिढी वाढतेय. आई बाबांचा वेळ मिळत नसल्याने हिंसक video गेम खेळण्यात रमलेली मुलं निरखून बघताना निरागसपण हरवत असल्याची जाणीव मन पोखरू लागली. दलाई लामा म्हणतात तसं आजकाल फक्त घर मोठं होऊ लागलय आणि कुटुंब छोट. औषधी खूप आहेत, पण आरोग्य हरवत चाललंय. किती सहज त्यांचे शब्द बरेचं काही सांगून गेले. मग हे विचार चित्रासारखे डोळ्यांसमोर तरळू लागले. अवतीभवती भर गर्दीतही एकाकी माणसांचे चेहरे अस्वस्थ करायला लागेल. काही क्षण अंगणात गोंधळ घालणारी चिमणीही आपल्या पावलांची सुंदर नक्षी मांडून जाते. आणि हे विचार तर डोक्यात कल्लोळ माजवत आहेत... गेले काही वर्ष! ह्यांचा एक वेडा वाकडा कोलार्जही छळतो कधी. मग ह्याला एक रूप देऊन बघायला काय हरकत आहे? या पिढीला गर्दीतही छळणारा हा एकांत आणि ही पोकळी चित्रात जिवंत होऊ लागली... जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून सतत धावणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये लपलेलं डॅंबिस मुल हळू हळू धावू लागल डोळ्यासमोर... आणि हि सगळी चित्र चौकट साकारायला मी ओढलागेलो....माझ्या ही नकळत! -मकरंद अनासपुरे Credits
Director Makrand Anaspure Producers Sayaji Shinde, Makrand Anaspure, Valmik Murkute Stars Makrand Anaspure Shubhankar Atre Lokesh Gupte Pradhyna Shastri Editor Santosh Gothoskar Executive Producer Sanjay Thube |